नाना पटोले यांची भाजपवर टीका

२२ नोव्हेंबर २०२२


छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारे राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसे काय समर्थन करू शकतात, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली.  छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले या आपल्या आदर्शाचा  अपमान करणाऱ्या भाजपचा आता खरा चेहरा समोर आला आहे. राज्यपाल कोश्यारी व भाजपचे  प्रवक्ते सुधेंदू त्रिवेदी यांनी शिवाजी महाराज यांचा अपमान केला आहे. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपालांची पाठराखण कसे करतात, असा सवाल पटोले यांनी केला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *