काही देश त्यांच्या परराष्ट्र धोरणाचा एक भाग म्हणून दहशतवादाचे समर्थन करतात – पंतप्रधान नरेंद्र मोदी

१९ नोव्हेंबर २०२२


काही देश त्यांच्या परराष्ट्र धोरणाचा भाग म्हणून दहशतवादाचे समर्थन करतात तर काही देश दहशतवाद्यांविरोधातील कारवाई रोखून अप्रत्यक्षपणे तसे करतात,असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटले. गृह मंत्रालयाने येथे आयोजित केलेल्या, दहशतवादाला आर्थिक मदतीस विरोध दर्शवणाऱ्या दहतवादविरोधी तिसऱ्या आंतरराष्ट्रीय मंत्रिस्तरीय परिषदेत (नो मनी फॉर टेरर-मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स ऑन काउंटर-टेररिझम फायनान्सिंग) नरेंद्र मोदी बोलत होते. यात ७० हून अधिक देश व आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

नरेंद्र मोदी म्हणाले की दहशतवाद्यांबद्दल सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संघटना आणि व्यक्तींनाही वेगळे पाडले पाहिजे. युद्ध नसणे म्हणजे शांतता असते, या भ्रमात आंतरराष्ट्रीय संघटनांनी राहू नये. छुप्या पद्धतीची युद्धेही धोकादायक व तितकीच हिंसक असतात. आंतरराष्ट्रीय संघटनांनी असा विचार करू नये की युद्ध नसणे म्हणजे शांतता. प्रॉक्सी युद्ध देखील धोकादायक आणि हिंसक असतात. दहशतवादाचे समर्थन करणाऱ्या देशांना त्याची किंमत मोजायला लावली पाहिजे.

काही देश त्यांच्या परराष्ट्र धोरणाचा एक भाग म्हणून दहशतवादाचे समर्थन करतात व त्याला राजकीय, वैचारिक आणि आर्थिक पाठबळ देतात, असे सांगून मोदी म्हणाले, दहशतवादी संघटनांना अनेक स्रोतांद्वारे अर्थपुरवठा होतो. त्याला काही देशही पाठिंबा देत असतात, हे सर्वज्ञात आहे. अशा बाबींत कोणत्याही ‘जर-तर’ला स्थान दिले जाऊ नये. जगाने सर्व प्रकारच्या म्हणजे दहशतवादाचे उघड किंवा छुपे समर्थन करणाऱ्या घटकांविरुद्ध एकत्र येण्याची गरज आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *