मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त सफाई कामगारांना साडी चोळी, मिठाई वाटप व अन्नदान आलम बाबा यांचा स्तुत्य उपक्रम

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२० ऑक्टोबर २०२१

निगडी


यमुना नगर येथील अ आणि फ जुलूस कमिटीच्या वतीने मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त गरीब सफाई कामगारांना सामाजिक कार्यकर्ते आलम बाबा शेख यांच्यावतीने साडी चोळी व मिठाईचे वाटप करण्यात आले. २० विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात आले. याप्रसंगी या कार्यक्रमाला नगरसेविका सुमनताई पवळे नगरसेवक सचिन चिखले माजी नगरसेविका सुलभाताई ऊबाळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाग अध्यक्षा वैशाली पवार राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे उपाध्यक्ष सुलतान तांबोळी ‘अ ‘प्रभाग कमिटीचे अध्यक्ष आलम बाबा शेख व कार्यकर्ते उपस्थित होते.निगडी यमुनानगर प्रभागामध्ये शांततेत मिरवणूक काढून उत्सव साजरा करण्यात आला.सामाजिक भान ठेवून शेख यांनी घेतलेल्या या उपक्रमाचे सगळीकडे कौतुक होत आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *