टी २० वर्ल्डकपमधील पराभवानंतर BCCI ची मोठी कारवाई; निवड समितीचे सर्व सदस्य बरखास्त

१९ नोव्हेंबर २०२२


नुकतीच​ ऑस्ट्रेलियात टी२० विश्वचषक स्पर्धा पार पडली. या स्पर्धेच्या सेमीफायनल सामन्यात टीम इंडियाचा इंग्लंडने दारूण पराभव केला. हा पराभव भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. सेमीफायनलमध्ये झालेल्या पराभवाचा मुद्दा बीसीसीआयने गांभीर्याने घेतला असून सर्व निवडकर्त्यांची हकालपट्टी केली आहे.

बीसीसीआयने निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा आणि त्यांच्या संपूर्ण टीमला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. इतकेच नाही तर बीसीसीआयने या रिक्त पदांसाठी नवीन अर्जही मागवले आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २८ नोव्हेंबर संध्याकाळी ६ वाजेपर्यंत असेल असं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं आहे. टी२० विश्वचषकासाठी बीसीसीआयच्या वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा होते. आता निवड समितीमध्ये चेतन शर्मा यांच्याशिवाय आणखी चार सदस्य हरविंदर सिंग (मध्य विभाग), सुनील जोशी (दक्षिण विभाग) आणि देबाशिष मोहंती (पूर्व विभाग) यांना थेट बाहेरचा रस्ता दाखवला आहे.चेतन शर्माच्या कार्यकाळात टीम इंडिया 2021 मध्ये खेळल्या गेलेल्या T20 वर्ल्ड कपच्या बाद फेरीपर्यंत पोहोचू शकली नव्हती. याशिवाय जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही टीम इंडियाचा पराभव झाला होता.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *