महागाई विरोधात शिरूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून, केंद्र सरकारचा जाहीर निषेध…

बातमी : विभागीय संपादक रविंद्र खुडे
शिरूर : दि. 04/07/2021.

घरगुती एल पी जी गॅस, पेट्रोल, डिझेल व इतर महागलेल्या गोष्टींमुळे, केंद्रातील मोदी सरकारचा, शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.

शिरूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याजवळ, राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चुलीवर भाकरी करून, केंद्रातील मोदी सरकारचा प्रतिकात्मक निषेध करण्यात आला.
यावेळी, शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने, प्रचंड गॅस दर वाढीच्या निषेधार्थ, गॅसच्या टाकीलाच पुष्पहार घालून आंदोलनाला सुरूवात करण्यात आली.

यावेळी उपस्थित राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मोदी सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली. त्यात …
“मोदी सरकारचे करायचे काय ?
खाली डोके वर पाय”
“मोदी सरकार हाय हाय”,
अशा घोषणा देण्यात आल्या.

कृषी उत्पन्न बाजार समितीतील आंदोलनानंतर, तहसिलदार लैला शेख यांना तहसील कार्यालयात जाऊन उपस्थितांनी निवेदन दिले.

यावेळी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिरुर तालुका महिला अध्यक्षा विद्या भुजबळ, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शिरुर तालुका अध्यक्षा संगीता शेवाळे, शिरुर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक मुजफ्फर कुरेशी, शिरुर तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे युवक अध्यक्ष सागर निंबाळकर, शिरूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष रंजन झांबरे, शिरुर तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष राजुद्दिन सय्यद, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुर शहर लिगल सेल अध्यक्ष रविंद्र खांडरे, ॲड. संजय ढमढेरे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहिल शेख, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिरुर शहर महिला अध्यक्षा पल्लवी शहा, शिरुर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती अध्यक्षा तज्ञीका कर्डिले, शिरुर शहर राष्ट्रवादी कांग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष कलिम सय्यद, शिरुर शहर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कार्याध्यक्ष हाफिज बागवान, शिरूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस युवक उपाध्यक्ष प्रतिक काशीकर, मृणाल कर्डिले, ललिता पोळ, सागर नरवडे, विशाल थिटे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Advertise

यावेळी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिरूर तालुका महिला अध्यक्षा विद्या भुजबळ यांनी व्यक्त केलेल्या आपल्या मनोगतात सांगितले की,
“सध्या राज्यामध्ये आणि देशांमध्ये कोरोना संसर्गामुळे, सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आला असताना, देशातील मोदी सरकारने घरगुती वापरातील एल पी जी गॅस, पेट्रोल, डिझेल व इतरही जीवनावश्यक वस्तूंच्या, खूप मोठ्या प्रमाणात दरवाढी करून सर्वसामान्य नागरिकांना महागाईच्या खाईत लोटलेले आहे. मोदी सरकारने केलेली अच्छे दिनची घोषणा व खरंच त्या घोषणेप्रमाणे, अच्छे दिन आलेत का ? अशी विचारण्याची वेळ आलीय.”

  तर राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलचे अध्यक्ष ऍड रविंद्र खांडरे यांनी मनोगत व्यक्त केले की, "देशात व राज्यात सुरु असलेली गॅस, पेट्रोल व डिझेल दरवाढ, यामुळे महागाई वाढली असून, सर्वसामान्य नागरिक अगदी मेटाकुटीला आला आहे. ही दरवाढ जर लवकर कमी केली नाही, तर देशातील व राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *