जास्त नफ्याचे आमिष दाखवून २६ लाखांची फसवणूक

१९ नोव्हेंबर २०२२

पिंपरी-चिंचवड


गुंतवणूक केलेल्या रकमेवर जास्त नफा मिळण्याचे आमिष दाखवून २६ लाख ९१ हजारांची फसवणूक केली. हा प्रकार रहाटणी येथे घडला. याप्रकरणी विश्वनाथ मोहन गोसावी (रा. आकाशगंगा सोसायटी, सीआयडी कॉलनी, रहाटणी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ए यु स्मॉल फायनान्स बँक खातेधारक व इतर अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला आहे. अज्ञात व्यक्ती सूरज, जयदीप, प्रतीक यांनी ऑटो एफएक्स ट्रेड कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे खोटे सांगितले. बनावट वेबसाइट तयार करून ती खरी असल्याची बतावणी केली. ऑनलाइन ट्रेडिंग केल्यास जास्त फायदा मिळण्याचे आमिष दाखवून फिर्यादी यांचा मुलगा अजित यास ट्रेडिंग अकाउंट तयार करण्यास लावले. त्यानंतर वेगवेगळी करणे सांगून ए यु स्मॉल फायनान्स बँक खात्यावर अजित यांना १६ लाख ९१ हजार रुपये गुंतविण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर फॉरेक्स ट्रेडिंगच्या आयडीवर चार कोटी रुपये प्रॉफिट झाल्याचे ॲपवरून दर्शवून आणखी दहा लाख रुपये देण्यास लावले. आशा प्रकारे आरोपींनी त्यांची २६ लाख ९१ हजारांची ऑनलाइन फसवणूक केली. वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *