भोसरीत दुकानांची तोडफोड

१९ नोव्हेंबर २०२२

भोसरी


भोसरी येथे टोळक्याने कोयते, हॉकी स्टीकने दुकानांची तोडफोड करून दहशत माजवली. दुकानातील रोकडही लुटली. याप्रकरणी प्रेषित गणेश मोरे (रा. सद्‍गुरुनगर, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अजय वीरेंद्र चव्हाण (वय १८, रा. सद्‍गुरुनगर, भोसरी) याला पोलिसांनी अटक केली असून विजय चव्हाण, पंकज शर्मा, नीलेश साळवे व आणखी पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे दुकानावर काम करीत असताना तेथे आलेल्या आरोपी विजय व पंकज यांनी फिर्यादीवर कोयता उगारला. काउंटर, फ्रिजची तोडफोड करून अडीच हजारांची रोकड लुटली.

भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

तसेच आरोपींनी सद्‍गुरुनगर परिसरातील इतर दुकानातील साहित्याची कोयते व हॉकी स्टीकने तोडफोड करून नुकसान केले तसेच परिसरात दहशत माजवली. त्यानंतर हे आरोपी राण तारा कॉलनीच्या दिशेने पसार झाले. याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *