ओझरचे नगरीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगनशेठ कवडे यांना मातृशोक

मंगेश शेळके 
ओझर प्रतिनिधी
२६ नोव्हेंबर ०२२

ओझर


ओझर नगरीचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, लाला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी संचालक , व विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे माजी खजिनदार , व ओझर गावचे माजी सरपंच जगनशेठ कवडे यांच्या मातोश्री व श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष तसेच युवा सेनेचे राज्य विस्तारक गणेशभाऊ कवडे यांच्या आजी गं.भा.सावित्रीबाई दत्तात्रय कवडे यांचे काल सांयकाळी ६.१५ मिनिटांनी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. या आजींना तीन मुले व तीन मुली ,नातवंडे ,पतवंडे असा आजींचा परिवार गणगोताने भरलेला होता.

ओझर गावचे ज्येष्ठ उद्योगपतीं श्री वसंतराव पोखरकर यांच्या या सावित्री आजी ज्येष्ठ भगिनी होत , तसेच ओझर गावचे दुसरे ज्येष्ठ उद्योजक श्री शिवाजी मार्तंड कवडे व ज्येष्ठ आदर्श शिक्षक व समाजसेवक भास्कर मार्तंड कवडे यांच्या त्या मावशी होत. त्याचप्रमाणे विघ्नहर देवस्थानचे माजी खजिनदार व विद्यमान विश्वस्त किशोर भाऊ कवडे यांच्या ह्या आजी होत. त्यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम आज शनिवार .दि २६/११/२०२२ रोजी नवीन गावठाण स्मशानभूमी मध्ये सकाळी ९.०० वाजता विधिवत पार पडला. आजींच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमास राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्ती त्याचप्रमाणे ओझरकर मंडळी गणेश भाऊ मित्र परिवार कवडे परिवार तसेच मीडिया क्षेत्रातील सर्व पत्रकार बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो हि विघ्नहर चरणी प्रार्थना . आपला आवाज न्यूज नेटवर्कचे परिवाराच्या वतीने या आजींना भावपूर्ण श्रद्धांजली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *