राहुल गांधी यांच्या विधानाशी महाविकास आघाडीचं काही घेणंदेणं नाही – जयराम रमेश

१८ नोव्हेंबर २०२२


स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विधान केलं. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. ठाकरे गटानेही राहुल गांधी यांच्या या विधानाशी सहमत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. राहुल गांधी यांना हे विधान करण्याची गरजच नव्हती. अशा विधानामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते, असा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला होता. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

राहुल गांधी यांच्या विधानाशी महाविकास आघाडीचं काही घेणंदेणं नाही. महाविकास आघाडीवर त्याचा काही परिणाम होणार नाही. हा वेगळा विचार आहे. वेगळा दृष्टीकोण आहे. हे वास्तव आहे, असं जयराम रमेश म्हणाले.काही राजकीय पक्ष सावरकरांच्या मुद्द्यावरून उगाचच वातावरण तापवत आहेत. त्यांनी वातावरण तापवू नये. ऐतिहासिक सत्य समजून घ्यावं. या संघटना, पक्ष ऐतिहासिक सत्य का नाकारत आहेत? असा सवालही त्यांन केला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *