वायसीएममधील मृतदेह अदलाबदलप्रकरणी चौकशी पूर्ण

१८ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती ( वायसीएम ) रुग्णालयात दोन महिलांच्या मृतदेहांची अदलाबदल झाली होती . शहरात खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेची तातडीने चौकशी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती . त्या प्रकरणातील दोन पोलिसांचे जबाब नोंदवून चौकशी प्रक्रिया गुरूवारी दि . १७ पूर्ण झाली आहे.

आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे लवकरच अहवाल सादर केला जाणार आहे . वायसीएम रुग्णालयात थेरगाव व दापोडी येथील दोन महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला . ते दोन्ही मृतदेह शवविच्छेदन कक्षात ठेवण्यात आले होते . दुसऱ्या दिवशी सकाळी त्यातील एक मृतदेह दुसऱ्याच नातेवाईकांकडे स्वाधीन करण्यात आला . हा प्रकार उघड झाल्यानतर संतप्त झालेल्या संबंधित नातेवाईकांनी वायसीएम रुग्णालयात गोंधळ घातला . रुग्णालयाच्या या हलगर्जी कामाबद्दल नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार केली होती.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *