महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मा दिलीपराव वळसे पाटील यांच्या विषेश प्रयत्नातून जम्बो कोविड सेंटरला नुकतीच मान्यता प्राप्त-तहसिलदार रमा जोशी यांची माहिती…

दि. ११ आंबेगाव : –
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी
महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मा दिलीपराव वळसे पाटील यांच्या विषेश प्रयत्नातून कोरोना आजाराच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उत्तर पुणे जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या जम्बो कोविड सेंटरला नुकतीच मान्यता मिळाली आहे.


सदर शिवनेरी जम्बो कोविड सेंटरचे उदघाटन राज्याचे गृहमंत्री मा दिलीपराव वळसे पाटील साहेब यांचे शुभहस्ते व खेड विभागाचे खासदार डॉ अमोल कोल्हे, यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच पुणे विभागाचे विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी पुणे डॉ राजेश देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद,  यांच्या प्रमुख उपस्थितीत  रविवार, दि 13.06.2021 रोजी दु.3.00 वा होणार आहे,


आंबेगाव तालुक्यातील अवसरी खु येथील शासकीय तंत्रनिकेतन या ठिकाणी सुरू होणाऱ्या या शिवनेरी जम्बो कोविड सेंटर मध्ये रुग्णासाठी 244 ऑक्सिजन बेड, 48 आय सी यु बेड  रुगणासाठी उपलब्ध होणार आहे, त्यामुळे उत्तर पुणें जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोना बाधित रुग्णांना चांगली सेवा देणे व येणाऱ्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोरोना बाधित बालरुग्णांसाठी विशेष सोय करण्याच्या उद्देशाने शासकीय व खाजगी लोकवर्गणीतील मदतीतून या शिवनेरी जम्बो कोविड रुग्णालयाची उभारणी करण्यात येत आहे, अशी माहिती आंबेगावचे तहसीलदार रमा जोशी यांनी दिली