ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदेंची शिंदे गटावर टीका

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१२ ऑक्टोबर २०२२


केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह आणि ‘शिवसेना’ हे नाव तात्पुरता गोठण्याचा निर्णय घेतल्यानंतर ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा संघर्ष तीव्र झाला आहे. दोन्ही गटाकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. दरम्यान ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिल्यानंतर काल शिंदे गटाला ढाल-तलवार हे चिन्ह निवडणूक आयोगाकडून देण्यात आले. त्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

शिंदे गटाला काय चिन्ह मिळाले यावर बोलण्याची आवश्यकता नाही. आमची मशाल ही धगधगती आग आहे आणि ४० मुंडक्यांच्या रावणाला ही आग पेटवल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया मनिषा कायंदे यांनी दिली आहे.आम्हाला जी मशाल मिळाली आहे, ती घरोघरी पोहोचवण्याचे काम आम्ही करू. या पोटनिवडणुकीत आमचाच विजय होईल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *