जितेंद्र आव्हाड यांना निलंबित करा – चंद्रशेखर बावनकुळे

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१५ नोव्हेंबर २०२२


भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचे आरोप केले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांना माझी विनंती आहे की, त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचं निलंबन करावं, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. कुणी आव्हाड यांचं समर्थन करत असेल तर त्यांना पण गुन्ह्यात घ्यायला हवं, असंही बावनकुळे म्हणालेत.

पवार कुटुंबियांनी बारामतीमध्ये ६०वर्षे सत्ता केली. सरकार चालवलं. तर त्यांनी उपकार केले नाहीत. बारामतीत दहशत आहे. आता शिंदेसोबत गेलेल्या आमदारांमध्ये दहशत नव्हती. त्यांना शिंदेंचं नेतृत्व आवडलं त्यामुळे ते शिंदेंसोबत गेले, असं बावकुळे म्हणालेत. शिंदे गट-भाजप सध्या एकत्र आहे. येत्या काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही एकत्रितपणे निवडणूका लढवणार आहे, असंही बावनकुळेंनी सांगितलं. गजानन कीर्तिकर यांच्या शिंदेगटात प्रवेशावरून बावनकुळे यांनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे. कीर्तिकर यांनी शिवसेनेसाठी कष्ट घेतले. सेना घराघरापर्यंत पोहचवली. मग त्यांना ठाकरेगट का सोडावा लागला? उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त चार लोक उरतील, असं बावनकुळे म्हणालेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *