किरण वाजगे
कार्यकारी संपादक
१८ ऑक्टोबर २०२१
नारायणगाव
१८१ गरजवंत विद्यार्थ्यांना किराणा वस्तूंचे वाटप
नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाच्या गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिरामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि गुरुवर्य नानासाहेब सबनीस दत्तक पालक योजनेअंतर्गत इनरव्हील क्लब, नारायणगाव,पालक-शिक्षक संघ, विलास पाटे आणि स्नेहा आनंद कोठारी, सुनील ढवळे सर यांच्या विशेष योगदानातून विद्यामंदिरातील १८१ गरजवंत विद्यार्थ्यांना किराणा वस्तूंचे वाटप करण्यात आले. अशी माहिती मुख्याध्यापक रवींद्र वाघोले आणि दत्तक पालक योजना प्रमुख राहुल नवले यांनी दिली.
याप्रसंगी दत्तक पालक योजनेचे प्रमुख देणगीदार विलास पाटे,स्नेहा कोठारी, इनरव्हील क्लब नारायणगावच्या संस्थापिका अंजली खैरे, अध्यक्षा सुजाता भुजबळ, मुख्याध्यापक रविंद्र वाघोले, डॉ.नंदिनी घाडगे, स्वाती मुदगल, ज्योती सोमवंशी, नंदा मुथा, सुनील ढवळे,योगिता गावडे,उषा सुपेकर,वनिता डेरे, प्रतिभा गावडे,चंद्रकांत मुळे,आनंद कोठारी,योजनाप्रमुख राहूल नवले,पालक संघाचे सचिव मेहबूब काझी,सुभाष दुबळे बबन गुळवे,शंकर केंगले, वैशाली बेल्हेकर,तृप्ती डेरे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
लॉकडाऊनच्या काळात सलग दोन वर्ष दत्तक पालक योजनेअंतर्गत गरजवंत विद्यार्थ्यांना… विशेष करून ज्या विद्यार्थ्यांचे आई किंवा वडिलांच्या पालकत्वाचे छत्र हरविले… अशा विद्यार्थ्यांना ही मदत दिली
कोरोना रोगामुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊनच्या काळात सलग दोन वर्ष दत्तक पालक योजनेअंतर्गत गरजवंत विद्यार्थ्यांना, विशेष करून ज्या विद्यार्थ्यांचे आई किंवा वडिलांच्या पालकत्वाचे छत्र हरविले आहे, अशा विद्यार्थ्यांना ही मदत दिली जाते.यापूर्वी गणवेश वाटप, हिवाळ्यात स्वेटर वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप आणि प्रसंगी शैक्षणिक खर्चासाठी संपूर्ण पालकत्व स्वीकारून विद्यार्थ्यांना मदत केली जाते असे मुख्याध्यापक रवींद्र वाघोले यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुपमा पाटे यांनी केले व आभार मेहबूब काझी यांनी मानले.