आळंदी कार्तिकी यात्रेनिमित्त गुरुवारपासून वाहतूक बंद

१५ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


आळंदी येथे १६ ते २३ नोव्हेंबरदरम्यान कार्तिकी यात्रा होत आहे . तसेच कार्तिकी एकादशीनिमित्त २० नोव्हेंबर व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन सोहळ्यानिमित्त २२ नोव्हेंबरला आळंदी येथे राज्याच्या व देशाच्या कानाकोपऱ्यातून वारकरी व भाविक येतात त्याअनुषंगाने पिंपरी – चिंचवड वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा , असे आवाहन वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सतीश माने यांनी केले आहे

कार्तिकी यात्रेनिमित्त आळंदी आणि देहू येथे मोठ्या संख्येने वारकरी व भाविक दाखल होतात . आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी होते.आळंदी येथील माऊली मंदिरातून सुरू झालेली दर्शनबारी देहूफाट्यापर्यंत येते . त्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत . दिघी – आळंदी , देहूरोड , तळवडे आणि चाकण वाहतूक विभागांतर्गत १६ ते २३ नोव्हेंबर दरम्यान वाहतुकीत हे बदल केले आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *