माजी ग्रामपंचायत सदस्य अमित कोऱ्हाळे यांचे निधन…

नारायणगाव (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
नारायणगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते अमित राजेंद्र कोऱ्हाळे यांचे अल्पशा आजाराने आजाराने बुधवार दिनांक सोळा रोजी पहाटे सव्वातीन वाजता निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ, वहिनी, चुलते असा परिवार आहे.


शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख व माजी पंचायत समिती सदस्य चंद्रशेखर कोऱ्हाळे व सामाजिक कार्यकर्ते जगन दादा कोऱ्हाळे यांचे ते पुतणे होत.
नारायणगावच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी अमित कोऱ्हाळे यांनी निवडणूक देखील लढवली होती. अनेक सामाजिक कामांमध्ये ते पुढाकार घेत असत. चेहऱ्यावर नेहमी स्मितहास्य असणारे व मितभाषी स्वभावाचे अमित कोऱ्हाळे यांचे अवघ्या ३७ व्या वर्षी निधन झाल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. आपला आवाज न्यूज नेटवर्क च्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.