नारायण राणेंकडूनच अधीश बंगल्यामधील अनधिकृत बांधकामावर हातोडा

१७ नोव्हेंबर २०२२


मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या मुंबईतील अधीश बंगल्यामधील अनधिकृत बांधकाम स्वतःहून हटवायला सुरुवात केली आहे. येत्या आठ ते दहा दिवसात हे बांधकाम हटवले जाईल. बंगल्यावर जो अनधिकृत भाग होता तो काढून नकाशाप्रमाणे नियमात बांधकाम ठेवले जाणार आहे. मुंबई महापालिकेने नारायण राणे यांच्या बंगल्याला नोटीस दिली होती त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले होतं.

नारायण राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले होते. याशिवाय हायकोर्टाने नारायण राणे यांना 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. सीआरझेड कायदा आणि एफएसआयचे उल्लंघन केल्याचे हायकोर्टाला आढळले. दोन आठवड्यात कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश हायकोर्टाने मुंबई महापालिकेला दिले होते. परंतु मुंबई महापालिकेने कारवाई करण्याच्या आधीच राणे यांनी स्वत:हून बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवण्यास सुरुवात केली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *