नवाब मलिक यांच्या जामीनावर २४ नोव्हेंबरला मुंबई सत्र न्यायालय देणार निर्णय

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१५ नोव्हेंबर २०२२


माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर २४ नोव्हेंबलला मुंबई सत्र न्यायालय निर्णय देणार आहे. दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध आहे, असा आरोप ईडीने केला आहे. मलिक यांना चालू वर्षी फेब्रुवारीमध्ये अटक झाली आहे. आतापर्यंत अनेकदा त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. विशेष न्या. राहुल रोकडे यांच्या न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून, निकाल राखून ठेवण्यात आला आहे. मलिक यांनी सर्व आरोपांचे खंडन केले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *