स्व. रसिकलाल माणिकचंद धारिवाल यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ३५१ जणांचे रक्तदान

रवींद्र खुडे
विभागीय संपादक
०५ मार्च २०२२

शिरूर


प्रसिद्ध उद्योगपती स्व. रसिकलाल माणिकचंद धारिवाल (RMD) यांच्या स्मृतिदिनानिमित्त, प्रकाशभाऊ धारिवाल मित्र मंडळ व मोरया जिम आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल रक्तदात्यांनी रक्तदान केलेय.हे शिबीर शिरूर नगर परिषदेच्या मंगल कार्यालयात भरवण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन उद्योगपती प्रकाश धारिवाल व आदित्य धारिवाल यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.या शिबिरात प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे यांनी आपले ५९ वे रक्तदान केले. तर स्व. रसिकलाल माणिकचंद धारिवाल यांचे नातू आदित्य धारिवाल यांनीही रक्तदान केले. मागील वर्षी सुद्धा आदित्य यांनी रक्तदान केलेले होते.


यावेळी नगरसेवक अभिजीत पाचर्णे, विठ्ठल पवार, माजी सरपंच विठ्ठल घावटे, नगरसेवक विनोद भालेराव, संजय देशमुख, नगरसेविका सुरेखा शितोळे, माजी उपनगराध्यक्ष जाकीरखान पठाण, माजी नगराध्यक्ष रविंद्र ढोबळे, संतोष भंडारी, राजेंद्र लोळगे, अनिल बांडे, मितेश गादिया, रक्ताचे नाते ट्रस्ट अध्यक्ष राम बांगड, संदीप कातोरे, प्रशांत शिंदे, प्रविण चोरडिया, संतोष शितोळे, तुकाराम खोले, योगेश जामदार, दादाभाऊ लोखंडे, सागर पांढरकामे, विशाल जोगदंड, अकबर शेख, विशाल जाधव, विक्रम जामदार, अजय डाडर, शारदा भुजबळ, चंदना गायकवाड, शितल शर्मा, प्रियंका धोत्रे उपस्थित होते.या रक्तदान शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. ज्या ज्या रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान केले त्यांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आली. आनंदऋषी ब्लड बँक, के.ई.एम. ब्लड बँक, अर्पण ब्लड बँक यांचे विशेष सहकार्य लाभले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *