जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देऊ नये – सुप्रिया सुळे

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१४ नोव्हेंबर २०२२


मुंबईच्या गर्दीत धक्का लागणं नित्याचच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांचा अनावधानाने महिलेला धक्का लागला असेल. त्यामुळं तत्काळ विनयभंगाची तक्रार दाखल करणं कितपत योग्य? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. राजीनामा हा पर्याय नाही, त्यामुळं जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देऊ नये, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी केली आहे. जितेंद्र आव्हाड एक चांगले लोकप्रतिनीधी असल्याचेही त्या म्हणाल्या.

जितेंद्र आव्हाड हे एक संवेदनशील व्यक्ती आहे. ते एक चांगले लोकप्रतिनीधी आहे. मुब्य्राच्या लोकांनी विश्वासाच्या नात्यानं लोकांनी त्यांना निवडूण दिलं आहे. अतिशय चांगल काम ते त्याठिकाणी करत आहेत. एक आदर्श आमदार म्हणून त्यांच्याकडं बघितलं जात असल्याचे सुळे यावेळी म्हणाल्या. त्यामुळं त्यांनी राजीनामा देऊ नये, अशी विनंती करत असल्याचे सुळे यावेळी म्हणाल्या.मी तीन चार वेळा तो व्हिडीओ पाहिला आहे. त्यामध्ये एक गोष्ट जावणली की, ही घटना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीजवळच झाली आहे. दुसरी गोष्ट तिथे प्रचंड गर्दी होती. एवढी मोठी गर्दी असताना जितेंद्र आव्हाड यांनी महिलेला बाजूला सारले, अनावधानाने त्या महिलेला धक्का लागला असेल. यामध्ये हा विनयभंग कसा होऊ शकतो असेही सुळे यावेळी म्हणाल्या. तरीसुद्धा त्या महिलेची बाजू आपण एकूण घेतली पाहिजे. पण पोलिस स्टेशनला जाऊन त्याची तक्रार दाखल करणे कितपत योग्य आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. याच आपण सर्वांनी विचार केला पाहिजे असे सुळे म्हणाल्या.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *