कोरोना जाणीव जागृती कार्यक्रमाचा समारोपसंपन्न…

भिमाशंकर :
आंबेगाव ब्यूरोचिफ
मोसीन काठेवाडी
आंबेगाव तालुक्यातील आदिवासी ठाकरवस्ती येथे कोविड 19 लसीकरणाचे प्रमाण कमी असल्याने लसीकरणा विषयी जाणीवजागृती करणे गरजेचे होते…

या पार्श्वभूमीवर दि.8 जून ते 14 जून 2021 या दरम्यान आंबेगाव तालुक्यातील सुमारे 25 पेक्षा अधिक ठाकरवस्ती येथे घरोघरी जाऊन लसीकरणाचे महत्व समजावून सांगण्यात आले व लसीकरणाची माहिती देणारी पुस्तिका ही वाटप करण्यात आली.

आदीम संस्थेच्या वतीने हे जाणीवजागृती अभियान आयोजित करण्यात आले होते,या जाणीव जागृती अभियानात कर्वे समाज सेवा संस्थेच्या व सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाच्या
विद्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या…

मागील सात दिवसांच्या कालावधीत कोरोना लसीकरणा विषयी अनेक गैरसमज दूर करून काही लोक लसीकरणासाठी पुढे आले आहेत ही या जाणीव जागृती अभियानाची जमेची बाजू आहे..

या जाणीवजागृती अभियानाच्या समारोप प्रसंगी जेष्ठ समाजसेविका श्रीमती साधना दधिच उपस्थित होत्या,यावेळी आदिवासी विकास प्रकल्प कार्यलयाचे कक्ष अधिकारी, श्री.योगेश खंदारे,दै. लोकमत चे पत्रकार निलेश काणंव,आदीम संस्थेचे डॉ.हनुमंत भवारी,डॉ.अमोल वाघमारे व किरण लोहकरे उपस्थित होते तर सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण बोऱ्हाडे,राजू घोडे उपस्थित होते…

यावेळी कोरोना लसीकरण जाणीव जागृती अभियानात सहभागी सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनी यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले….

Advertise

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा बांबळे, प्रास्ताविक युवराज काळे तर आभार स्नेहल साबळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *