पिंपरी चिंचवड | भाजीपाल्याचे भाव घसरले, लाखमोलांचा भाजीपाला कवडी मोल भावात
पिंपरी चिंचवड / पुणे
पिंपरी चिंचवड शहरातील मोशी मार्केट मध्ये भाजीपाल्येचे भाव घसरले असून शेतकर्यांचा लाखमोलांचा भाजिपाला कवडी मोल भावात विकला जातोय .गेल्या काही दिवसांमध्ये गगणाला भिडलेले पालेभाज्यांचे व फळ भाज्यांचे भाव आता मात्र उतरल्याच पाहायला मिळतायत तर गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे भाव वाढलेले होते तर आजचा टोमॅटोचा भाव आज जर पाहीला तर हाच टोमॅटो आज 60 रपये पासून 100 पर्यंत विकला जात आहे. मागील काही दिवसात हाच टोमॅटो दोनशेपर्यंत पोहोचला होता त्यामुळे नागरिकांच्या खिशाला कात्री लागत होती याच कारणामुळे राज्य शासनाने व केंद्र सरकारने बाहेरच्या राज्यातून टोमॅटो मागवण्याचा निर्णय घेतला बाहेरच्या राज्यातून टोमॅटो मागवलेला हा आज पुण्यात दाखल झाला बाहेरच्या राज्यातून मागवलेला टोमॅटोला हॉटेल व्यवसायिकांची पसंती दिसून येत आहे पण किरकोळ बाजारामध्ये नागरिकांनी या टोमॅटोला पाठ फिरवलेली सध्या पाहायला मिळत आहे . आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या टोमॅटोला ग्राहक जास्त पसंती देत आहेत. त्यामुळे बाहेरच्या राज्यातून सरकारने टोमॅटो मागवला खरा पण नागरिकांनी याला पसंती दर्शवल्याचं पाहायला मिळत नाही. आज मोशी मार्केट येथे टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने टोमॅटोचे भाव वधारलेले सध्या पाहायला मिळत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात सर्वसामान्य ग्राहक देखील टोमॅटो खरेदी करताना पाहायला मिळणार आहे.तर आजच्या भाजीपाल्येचे भाव काय आहेत ते पाहणार आहोत …

टोमॅटो (1 कीलोचे भाव) 50 ते 100
गवार (1 कीलोचे भाव) 40 ते 50
फ्लावर (1 कीलोचे भाव) 20 ते 25
कांदा (1 कीलोचे भाव) 10 ते 15
बटाटा (1 कीलोचे भाव) 10 ते 15
लसूण (1 कीलोचे भाव) 100 ते 120
आले (1 कीलोचे भाव) 100 ते 120
मिरची (1 कीलोचे भाव) 50 ते 70
कोथिंबीर (100 गड्डीचे भाव) 300 ते 500
मेथी (100 गड्डीचे भाव) 400 ते 600
शेपू (100 गड्डीचे भाव) 300 ते 600
पालक (100 गड्डीचे भाव) 300 ते 500