संस्थापक स्व.गुलाबराव डेरे पाटील यांच्या नवव्या स्मृती दिनानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन.

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
१२ नोव्हेंबर २०२२

नारायणगाव


नारायणगाव येथील धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्था ही रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना सहकार क्षेत्रात उत्तम रीतीने कार्यरत असून नारायणगावच्या पश्चिम विभागाच्या विकासात संस्थेचा वाटा मोठा आहे, तसेच संस्थेने आर्थिक व्यवसायासोबत परिसरात उभे केलेले सेवाकार्य कौतुकास्पद आहे असे मनोगत लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांनी व्यक्त केले. संस्थेचे संस्थापक स्वर्गीय गुलाबराव डेरे पाटील यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड,पुणे, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य अभियान अंतर्गत डॉ.मते हॉस्पिटल, नारायणगाव,डॉ. शिंगोटे हॉस्पिटल , जुन्नर आणि ग्रामपंचायत नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे बोलत होते.

धर्मवीर संभाजी पतसंस्थेचे सेवाकार्य कौतुकास्पद – सरपंच योगेश पाटे

याप्रसंगी धर्मवीर संभाजी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंतराव देशमुख,उपाध्यक्ष शंकरराव कोल्हे,उपसरपंच आरीफ आतार,संतोष दांगट, संतोष वाजगे, तेजस वाजगे, डॉ.अजय मते, डॉ.प्रसाद शिंगोटे,लोकमान्य हॉस्पिटल चिंचवडच्या जनसंपर्क अधिकारी पूजा महामुनी,अस्थिरोग तज्ञ डॉ. आदित्य देशमुख,कर्करोग तज्ञ डॉ.प्रसाद नांदोडे, हृदयरोग तज्ञ डॉ.सना खान, डॉ.अमित पवार, किरण वाजगे, समन्वयक यशवंत बोराडे, ओंकार खांडेकर, केशव डेरे,भाऊसाहेब डेरे, किशोर डेरे, भागेश्वर डेरे,संचालक मेहबूब काझी,सिताराम खेबडे,विठ्ठल श्रीवत,राजेश कोल्हे,कैलास औटी,प्रवीण डेरे,रामा शिंदे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


या शिबिरामध्ये लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड यांसकडून अस्थिरोग आणि हृदयरोगांवर रुग्णांची विशेष तपासणी करण्यात आली तसेच डॉ.मते हॉस्पिटल नारायणगाव यांस कडून मूत्रविकार आणि जनरल शास्त्रक्रिया तसेच डॉ.शिंगोटे हॉस्पिटल जुन्नर यांस कडून स्त्रीरोगांसंबंधी आवश्यक शस्त्रक्रिया यासंबंधी मार्गदर्शन करून आवश्यक शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत केल्या जातील असे तीनही हॉस्पिटलच्या वतीने सांगण्यात आले. शिबिरामध्ये विविध विभागात सुमारे 300 रुग्णांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेहबूब काझी यांनी केले प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर औटी यांनी केले व आभार राजेंद्र कोल्हे यांनी मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *