पिंपरी पेंढार येथे आज सुरू होणाऱ्या कोविड सेंटर साठी पशुवैद्यकीय डॉ सोनवणे व इलेव्हन मारुती ग्रुप यांच्याकडून २१ हजाराची मदत…

कैलास बोडके
प्रतिनिधी

पिंपरी पेंढार- दि ११ मे २०२१
कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात केली तर समाजातील लोक पुढे येऊन नक्कीच मदत करतात. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. जुन्नर तालुक्यात जास्तच कोरोना चे रुग्ण आढळतात. रुग्णांना सेवा देण्यासाठी बऱ्याच सेवाभावी संस्था पुढे येऊन जसे शक्य होईल तशी मदत करण्याचे काम सध्या सुरू असल्याचे पाहायला मिळते. रक्तदान शिबिरे असो की प्लाझ्मा दान शिबीरे असोत आपापल्या परीने मदतीचा हात देताना दिसत आहे . त्याचाच एक भाग म्हणून सध्या जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार या गावात पिंपरी पेंढार युथ सोशल फाउंडेशनच्या वतीने कोविड सेंटर उभारण्याची संकल्पना सर्व प्रथम समोर आली पण काही अडचणीमुळे होऊ शकले नव्हते. नंतर तालुक्यातील ठिकेकरवाडी, धोलवड व पिंपरी पेंढार या गावातील प्रतिनिधी एकत्र येऊन धोलवड या ठिकाणी सर्व गावांसाठी कोविड सेंटर उभारावे असेही ठरले व त्यासाठी फाउंडेशन च्या माध्यमातून अध्यक्ष विमलेश गांधी यांनी जर धोलवड येथे कोविड सेंटर उभारले तर आमच्या कडून तीन लाख रु ची रोख मदत केली जाईल असे जाहीर केले होते पण तेही बरगळले. इकडे पिंपरी पेंढार मध्ये रुग्णाची संख्या वाढत चालली व गावातील तरुण कोरोनाचे बळी ठरले.


मग परत कोविड सेंटर व्हावे यासाठी फाऊंडेशनच्या सर्वच सदस्यांनी मनावर घेऊन सगळ्याच अडचणीवर मात करत आजपासून पिंपरी पेंढार येथे कोविड सेंटर सुरू होत आहे. या फाउंडेशन चे ब्रीदवाक्याच ” एक पाऊल माणुसकीसाठी ” हे असून त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम सुरू करत आहेत व त्यासाठी मदतीचा ओघही सुरू झाला असून पशुवैद्यकीय डॉ सोनवणे व इलेव्हन मारुती ग्रुप यांच्याकडून रोख २१हजाराची मदत देण्यात आपली. व मंडळाचे सक्रिय सदस्य राघव पोटे व विमलेश गांधी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
या फाउंडेशन च्या माध्यमातून नेहमीच सामाजिक उपक्रम हाती घेतले जातात. रक्तदान शिबिर असो की वृक्षारोपण , गावातील रस्ते, स्मशान भूमी मध्ये वृक्षारोपण, लाईट वेवस्था अशी कमी होती घेऊन पार पाडली.
या कोरोनाच्या बिकट काळात फाउंडेशन वतीने प्लाझ्मा दान व प्लाझ्मा मिळवून देण्यासाठी संकेत जोरी याच्या नेतृत्वाखाली बऱ्याच नागरिकांना प्लाझ्मा मिळवून देण्याचे काम हाती घेऊन पार पाडत आहेत.
आजपासून सुरू होणाऱ्या कोविड सेंटर साठी समाज्यातुन मदतीचा हात पुढे येत असून त्या सरकारी काम करणाऱ्या अधिकार्यांनिही फाउंडेशन चे काम पाहून मदतीला पुढे आले त्यात याच गावात