रोहित खर्गे
विभागीय संपादक
भोसरी- दि ६ जून २०२१
सामाजिक भान जपत, जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन जुन्नर तालुका मित्र मंडळ व भूगोल फाऊंडेशनने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भोसरी इंद्रायणीनगर सर्कल येथे वृक्षारोपण केले. यावेळी भूगोल फाउंडेशन चे विठ्ठल नाना वाळुंज यांनी विविध झाडांची माहिती व त्यांचे असणारे फायदे याविषयीची माहिती व झाडांचे आपल्या जीवनात असणारे महत्व व त्याविषयी सर्व माहिती सदस्यांना दिली. विठ्ठल नाना यांचा जन्मच वृक्ष सवर्धनासाठीच झाला की काय असे वाटल्याचे इतर सदस्यांनी सांगितले. कारण विठ्ठल नाना वाळुंज यांनी आपले जीवनच या वृक्षवल्लींसाठी समर्पित केलेले असून जे त्यांचे मित्र होतात ते पर्यावरणवादी झाल्याशिवाय राहत नाही कारण नानांकडे बोलायला एकच विषय असतो आणि तो म्हणजे वृक्ष संवर्धन आणि म्हणूनच कोरोना काळात एकत्र जास्त गर्दी न करता भूगोल फाउंडेशन च्या सर्व सदस्यांना जेथे जागा भेटेल तेथे आणि जेथे असाल तेथे प्रत्येकाने एक किंवा दोन झाडे लावण्याचे आवाहन केले व त्याला साद देत इतर सदस्यांनी आपल्या आजूबाजूच्या परिसरात झाडे लावून त्याचे फोटो भूगोल फाउंडेशन च्या ग्रुप वर टाकण्यात आले व आज ग्रुप वर झाडे लावतानाच खूप फोटो सदस्यांनी अपलोड केल्यामुळे विठ्ठल नाना वाळुंज भलतेच खुश होते आणि आपण करत असलेल्या कामाचे काहीतरी चीज होत असल्याचे आपला आवाजकडे बोलताना सांगितले.
त्याचमुळे आम्हीही त्यांच्या सान्निध्यात येऊन प्रत्येकवर्षी त्यांच्या खांद्याला खांदा लावून खारीचा वाटा म्ह्णून काही प्रमाणात झाडे लावत असल्याचे आणि त्यांच्या या उपक्रमात सहभागी होण्याचे हे सलग तिसरे वर्ष असल्याचे जुन्नर तालुका मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर ढोमसे व दीपक सोनवणे यांनीही बोलताना सांगितले.
इंद्रायणीनगर भोसरी येथील सर्कलला लिंब, अशोका, पिंपळ, गुलमोहर , सिल्वर, जांभुळ , आदी प्रकारच्या झाडांची लागवड केली.यावेळी जुन्नर तालुका मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर ढोमसे,भूगोल फाऊंडेशन व इंद्रायणी सेवा संघाचे विठ्ठल नाना वाळुंज,आण्णासाहेब मटाले, सुनील पाटे पाटील,दिपक सोनवणे, मंगेश कुटे, संकेत जाधव, प्रकाशदादा आणि काचळे वहिनी, प्रदिप काचळे,प्रतिक मोटे,कु.अपुर्वा वाळुंज, आनंदा मुळे,कु.साहिल निमसे, राजेंद्र निमसे,अनिल रासकर यांनी
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपत वृक्षारोपण केले.
आपणही एकतरी वृक्ष लावून वृक्षसंवर्धनाचे व पर्यावरणरक्षणाचे महत्वाचे कार्य करूयात.
पाणी वाचवा, जिवन वाचवा
झाडे लावा , झाडे जगवा.
निसर्ग जपा नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करा. असा संदेश दोन्ही संस्थेच्या वतीने देण्यात आला.