एखाद्या गोष्टीचा कांगावा करणं ही जितेंद्र आव्हाडांची स्टाईल आहे – देवेंद्र फडणवीस

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१२ नोव्हेंबर २०२२


एखाद्या गोष्टीचा कांगावा करणं, ही जितेंद्र आव्हाड यांची स्टाईल असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.आव्हाडांना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, एखाद्या गोष्टीचा कांगावा करणं, ही जितेंद्र आव्हाड यांची स्टाईल आहे. त्यामुळे आव्हाड हे कायमच कुठल्याही गोष्टीचं अशाप्रकारे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करतात. सगळ्यांना माहिती आहे की, त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत जाऊन चित्रपटगृहात जो तमाशा केला, जी मारहाण केली, त्यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना अटक झाली होती. कोणीही अशाप्रकारे कायदा हातात घेतला असता तर त्याच्यावर हीच कारवाई झाली असती. पण जितेंद्र आव्हाड यांच्याकडून आपण खूप काही मोठं केलंय, हे दाखवण्याच्या नादातून सगळ्या गोष्टी घडल्या, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

ठाणे न्यायालयाने विवियाना मॉल प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर आव्हाड यांच्या वकिलांकडून तात्काळ जामिनासाठी अर्ज करण्यात आला. तेव्हा न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आव्हाड यांना जामीन मंजूर केला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *