महानगरपालिका खर्चाने कोवीड लस उत्पादकाकडून थेट खरेदीबाबत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांच्याकडे मागितली परवानगी..

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि. १० मे २०२१
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची कोरोना परिस्थिती सद्यस्थितीत नियंत्रणात असली तरी कोरोना विषाणूचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन शहरातील नागरिकांचा बचाव करणे तसेच आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी करणेकामी महापालिका हद्दीतील १८ वर्षावरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देणे आवश्यक आहे. त्यामुळे महापौर उषा उर्फ माई ढोरे यांचे अध्यक्षतेखाली पदाधिका-यांची नुकतीच तातडीची बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये शासनामार्फत महानगरपालिकेस उपलब्ध होणारा कोवीड लसींचा तुटवडा जाणवत असल्याचा विचार करुन शहरवासीयांसाठी सुमारे १५ लाख लस थेट उत्पादकाकडून खरेदी करण्याचा आणि त्यासाठी राज्य शासनाची परवानगी घेणेबाबत बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला होता.

      त्याअनुषंगाने महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी थेट महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, राजेश टोपे यांना पत्र दिले असून शहरातील सद्यस्थितीचा व भविष्यात उद्भवू शकणा-या कोरोनोच्या गंभीर परिस्थितीचा विचार करुन पिंपरी चिंचवड शहरवासीयांसाठी महापालिका खर्चाने थेट उत्पादकांकडून लस खरेदी करण्यास परवानगी द्यावी आणि सहकार्य करावे अशी विनंती पत्राद्वारे केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *