पाटस येथील दुहेरी हत्याकांडातील चौघे आरोपी जेरबंद : पुणे ग्रामीण एलसीबी पथकाची कामगिरी…

बातमी : विभागीय संपादक रविंद्र खुडे
यवत : दि. 05/07/2021.

दिनांक ४/७/२०२१ रोजी रात्री १०.०० वा. चे सुमारास, पाटस तामखडा येथील भानोबा मंदिराचे समोर, महेश उर्फ मन्या भागवत याने शिवम शितकल यास फोनवरुन आई बहिणीवरुन शिव्या देवून, तामखडा येथे बोलावल्यावरुन शिवम संतोष शितकल वय २३ वर्षे व गणेश रमेश माकर वय २३ वर्षे, दोघे रा. पाटस, अंबिकानगर, ता. दौंड, जि. पुणे, हे शिव्या का दिल्या याचा जाब विचारण्यासाठी गेले असता, तेथे आरोपी नामें महेश उर्फ मन्या संजय भागवत, महेश मारुती टुले, रा. पाटस, तामखडा, ता. दौंड, जि. पुणे व त्यांचे सोबतचे अनोळखी ४ ते ५ साथीदार, यांनी शिवम संतोष शितकल, वय २३ वर्षे व गणेश रमेश माकर, वय २३ वर्षे या दोघांना तलवार, काठयांनी मारहाण करुन खाली पाडून त्यांच्या डोक्यावर दगड मारुन, चेंदामेंदा करुन निघृणपणे खुन करुन पळून गेल्याबाबत यवत पो. स्टे. गु.र.नं .५८८/२०२१ भादंवि क. ३०२, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ आर्म ॲक्ट कलम ४, २५ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने व खुन करून आरोपी फरार झाल्याने, गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेमार्फत करण्याबाबत, पुण्याच्या पोलीस अधीक्षकांनी आदेश दिलेले होते. त्याप्रमाणे, पुण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमण्यात आलेले होते. सदर पथकाने तपास करुन गुन्हयातील आरोपींची माहिती काढून गुन्हा करुन फरार झालेले आरोपी नामे –

१) महेश उर्फ मन्या संजय भागवत, वय २२ वर्षे, रा. पाटस, तामखडा, ता. दौंड, जि. पुणे.
२) महेश मारुती टुले, वय २० वर्षे, रा. पाटस, तामखडा, ता. दौंड, जि. पुणे.
३) युवराज रामदास शिंदे, वय १९ वर्षे, रा. गिरीम, मदनेवस्ती, ता. दौंड, जि. पुणे.
४) गहिनीनाथ बबन माने, वय १९ वर्षे, रा. गिरीम, राघोबानगर, ता. दौंड, जि. पुणे.

Advertise


यांना ड्रायव्हर ढाबा, बारामती एअरपोर्ट रोड, येथून ताब्यात घेतलेले आहे. सदर आरोपींना पुढील कारवाईसाठी यवत पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलेले असून, सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक मिलींद मोहिते, दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, पो. उप. नि. रामेश्वर धोंडगे, पो. हवा. महेश गायकवाड, पो. हवा. निलेश कदम, पो. हवा. दत्ता तांबे, पो. हवा. सचिन गायकवाड, पो. हवा. सुभाष राऊत, पो. ना. गुरु गायकवाड, पो. ना. अभिजित एकाशिंगे, स. फौ. काशिनाथ राजापुरे, स. फौ. शब्बीर पठाण, पो. हवा. विद्याधर निश्चित, पो. हवा. प्रमोद नवले, पो. ना. गुरु जाधव
यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *