धरणग्रस्तांना लवकर न्याय मिळाला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर लोकशाही बाधित धरणग्रस्त समवेत आंदोलन केले जाईल असा इशारा गौतमराव खरात यांनी दिला

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ 
२३ ऑक्टोबर २०२१

आंबेगाव


आंबेगाव तालुक्यातील धरणग्रस्तांचे प्रस्ताव जिल्हा पूर्वसन कार्यालयात धूळ खात पडले असून धरणग्रस्त हेलपाटे मारून हैराण झाला आहे या धरणग्रस्तांना लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर लोकशाही बाधित धरणग्रस्त समवेत आंदोलन केले जाईल असा इशारा युगप्रवर्तक प्रतिष्ठाण चे संस्थापक अध्यक्ष गौतमराव खरात यांनी दिला आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार साहेब यांनी डिंभे धरणाचे भूमिपूजन करून तब्बल २०वर्षानंतर म्हणजे १९८५-८६ साली पूर्ण झाले या मध्ये आंबेगाव तालुक्यतील एकूण २४ ,गावे संपादित झाली त्यापैकी ११ पूर्णतः बाधित तर १३,अंशतः बाधित झाली गावे असून त्या गावातील अनेक धरणग्रस्तांचे पुनर्वसन अद्याप झाले नाही जवळ जवळ ३५ /३६ वर्षे उलटून गेली पण अजूनही अनेक धरणग्रस्त शेतकरी जमिनी पासून वंचित असून सध्या त्यांची वडिलोपार्जित जमीन डिंभे धरणाच्या पाण्याखाली तर मिळणारी जमिनीचे प्रस्ताव पुणे जिल्हा पूर्वसन कार्यालयात धूळ खात पडून मग धरणग्रस्तांना न्याय कोण देणार हा खरा प्रश्न आहे.

काही धरणग्रस्तांचे प्रस्ताव गेले २ वर्ष झाले जिल्हा पूर्वसन कार्यालयात पडून आहेत या बाबत धरणग्रत चौकशी साठी गेले असता तेथील लिपिक उडवाउडवीची उत्तरे देऊन धरणग्रस्तांना हाकलून देतात. वास्तविक जिल्हा पूर्वसन कार्यालय आणि धरणग्रस्त शेतकरी यांच्या गावातील यानंतर १५०, की मी असून एस टी बस ची सोय नाही त्यामुळे धरणग्रस्त कार्यालयात पोहचण्याची वेळ साधारण २ वाजता असते व येथील कर्मचाऱ्यांचा भोजनाची वेळ हीच असते त्या काळात धरणग्रस्त शेतकऱ्याला २ तास ताटकळत बसावे लागते परत घरी जाण्याच्या आशेने पुन्हा अधिकाऱ्यांची भेट न घेता धरणग्रस्त व्यक्ती नाईलाजास्तव परत येतात त्यामुळे ज्या भागात धरणग्रस्त आहेत त्या तालुक्याच्या ठिकाणी आठवड्यातून एक दिवस तहसिल कार्यालयात पूर्वसन कार्यालयातील लिपिक येऊन धरणग्रस्तांच्या प्रस्ताव बाबत ,भूखंड बाबत, व काही समस्या बाबत माहिती घेतली तर धरणग्रस्तांच्या समस्या लवकर सुटतील असे मत खरात यांनी मांडले.तरी या बाबतचे निवेदन विभागीय आयुक्त सौरभ राव,जिल्हाधिकारी राजेश देशमुख यान युगप्रवर्तक प्रतिष्ठाण चे अध्यक्ष गौतमराव खरात,शिवसेनेचे तालुका उपप्रमुख अमोल अंकुश ,चास गावचे मा सरपंच माऊली भोर,सामाजिक कार्यकर्ते नागेश कोकणे यांनी दिले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *