राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१२ नोव्हेंबर २०२२


विवियाना मॉल मारहाण प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आव्हाड यांना 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केल्याने आव्हाड यांचा सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे

विवियाना मॉलमध्ये प्रेक्षकाला मारहाणप्रकरणी काल जितेंद्र आव्हाड यांना वर्तकनगर पोलिसांना अटक केली होती. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून आज न्यायालयाने 14 दिवसांनी न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी जामीनासाठी कोर्टात अर्ज केला होता. त्यानंतर न्यायालयाने त्यांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *