जितेंद्र आव्हाडांना चंद्रकांत पाटील यांचा सल्ला

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१२ नोव्हेंबर २०२२


‘हर हर महादेव’ चित्रपट बंद पाडल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या अटकेनंतर भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी सडकून टीका केली आहे. एखादा चित्रपट तुम्हाला आवडला नाही, तर सिनेमागृहाबाहेर गळ्यात बोर्ड लटकवून उभे राहा आणि चित्रपट पाहू नका असे सांगा. या आवाहनाला ज्यांना प्रतिसाद द्यायचा असेल ते देतील असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

तुम्हाला एखादा विषय आवडला नाही. हा संघर्षाचा विषय आहे का? असा सवालही पाटील यांनी आव्हाडांना विचारला आहे. सरकार सत्तेतून गेल्याचं सहन होत नसल्याने रोज उठसूठ संघर्ष करण्याचा आव्हाड प्रयत्न करत आहेत, असा आरोप पाटील यांनी केला आहे. आव्हाडांवरील कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीच्या विरोधात लढणे, हा आजच्या महाराष्ट्रात गुन्हा झाला आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली होती. यावरुनही चंद्रकांत पाटील यांनी टीकास्र डागलं आहे. “तुम्ही म्हणाल तोच इतिहास काय? तुम्हाला पाहिजे ते मांडायला हुकुमशाही आहे का? ही दादागिरी चालणार नाही असं चंद्रकांत पाटील म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *