19 व्या आंतरराष्ट्रीय फोका संस्कृती आणि कला नृत्य महोत्सव मध्ये भारताचे प्रतिनिधित्व

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१९ सप्टेंबर २०२२


भारतामध्ये असलेल्या विविध परंपरा आणि संस्कृती यामुळे भारताचे एक वेगळे स्थान आपल्या जगामध्ये निर्माण झालेले आहे. विविध कला क्षेत्रात भारताने आपले प्रतिनिधित्व अनेक देशांमध्ये केलेले आहे.

दिनांक 9 ते 13 सप्टेंबर या कलावधीत तुर्की या देशा मध्ये झालेल्या 19 व्या आंतरराष्ट्रीय फोका संस्कृती आणि कलानृत्य महोत्सवांमध्ये पुण्यातील महिलांनी सहभागी होऊन आपल्या भारताचे प्रतिनिधित्व केले.

या मध्ये संगीता तरडे, शोभा कदम, शुभांगी बडवे, निशा छाब्रिया, सुजाता शेट्टी, राजश्री कौंडस, शुभांगी गोळे, या महिला ग्रुपने राजस्थानी घूमर नृत्य सादर केले. नृत्य सादर करण्यासाठी महिलांनी आठ ते दहा दिवस त्याचा सराव केला त्यांना मार्गदर्शन नृत्य दिग्दर्शक रवी ढगे यांचे मिळाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *