पीएमपीचा कारभार, इलेक्ट्रिक बसला चार्जिंग करण्याचे विसरल्याने खोळंबा

१२ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


देहू येथील पीएमपी बसला ऐनवेळी चार्जिंग नसल्याने प्रवाशांचा बसस्थानकावर तब्बल एक तास खोळंबा झाला . त्यामुळे शाळा , कॉलेज व नोकरी – व्यवसायासाठी पिंपरी चिंचवड शहरात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली . देहूच्या पीएमपी डेपोत प्रवाशांनी चौकशी केली . त्यावेळी इलेक्ट्रिक बसला चार्जिंग करण्याचे विसरल्याने एक तास वेळ लागणार असल्याचे सांगण्यात आले . देहू येथे पिंपरी – चिंचवड शहरातून नागरिक रोज दर्शनासाठी येतात . मुले व मुलींना शाळा , कॉलेज व नोकरीसाठी रोज ये – जा करावी लागते . मंगळवारी चार्जिंग नसल्याने बस एक तास उशिरा आल्याने नागरिकांची गैरसोय झाली.

ऐनवेळी प्रवाशांची धावपळ चार्जिंग नसल्याने बसला एक तास उशीर होणार असल्याचे पीएमपी डेपोतून सांगण्यात आले . त्यानंतर प्रवाशांची ऐनवेळी धावपळ उडाली . कोणाला नोकरीच्या ठिकाणी , काही विद्यार्थ्यांना शाळा व कॉलेजमध्ये वेळेवर जायचे होते . ही वेळ पकडण्यासाठी प्रवाशांना खासगी वाहने व रिक्षातून ऐनवेळी प्रवास करावा लागला . तर काही रहिवासी महिलांनी पुन्हा घरी परत जाण्याची निर्णय घेतला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *