उद्धव ठाकरे यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे – नवनीत राणा

०१ डिसेंबर २०२२


उद्धव ठाकरे यांनी राज्याची पहिली मुख्यमंत्री म्हणून आपल्याला महिलेला बसवायचं आहे, अशी घोषणा शिवशक्ती-भीमशक्तीच्या मेळाव्यात केली. उद्धव ठाकरे यांच्या या विधानावर नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आम्ही महिला खूप टॅलेंटेड आहे. पहिली महिला राष्ट्रपती आमच्याच जिल्ह्यातून झालेली आहे. मला त्याचा अभिमान आहे. पण ज्यांनी घोषणा केली, त्यांच्या मुखातून हे शब्द पचत नाहीत. ज्याना स्वतः मुख्यमंत्री व्हायची हौस आहे. ते दुसऱ्याला मुख्यमंत्री व्हायचे स्वप्नं कसे पाहू शकतात? उद्धव ठाकरे यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे असतात,असं नवनीत राणा म्हणाल्या. आम्ही उद्धव ठाकरेंचं विधान फार गांभीर्याने घेत नाही. पण महिला मुख्यमंत्री झाली तर आम्हाला त्याचा अभिमानच वाटेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *