नवरात्र म्हणजे नऊ रंगांचा उस्तव,हा आनंद प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने साजरा करताना दिसतो . नवरात्रीत देवीची आराधना केली जाते . नवरात्रीच्या ९ दिवसात देवीची पूजा करण्यासाठी भारतीय शास्त्रांमध्ये वेगवेगळ्या ९ रंगाचा वापर केला जातो .
देवीच्या अवतारा प्रमाणे या रंगाचेदेखील तितकंच महत्व आहे .राखाडी स्थिर आणि सुरक्षितता ,केशरी त्यागाचं ,पांढरा शांततेचं , लाल प्रमाचे , निळा व्यापकता ,पिवळा चेतन्याचे , हिरवा समृद्दीचे , मोरपंखी प्रोत्साहन , जांभळा समाधानचे प्रतीक मानलं जात , या ९ रंगाप्रमाणेच समाजातील महिला ही विविध क्षेत्रात कार्य करताना दिसतात.
आपला आवाज आपली सखी ने एक नवीन स्पर्धा आयोजित केली होती ज्यामध्ये "आपला आवाज आपली सखीच्या "फेसबूक पेज वर नवरात्रीचे ९ दिवस वेगवेगळ्या रंगाच्या साड्या घालून आपला सुंदर फोटो पोस्ट करायचा होता"
या स्पर्धेसाठी स्पर्धकांकडून खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
अमृता मिथापेल्ली – (राखाडी),डिंपल काळे – (केशरी),श्वेता धायगुडे – (पांढरा),तनुजा काळेकर – (लाल),पलवी पाचबुद्धे – (निळा),शिवानी बराटे – (पिवळा),योगिता वरागडे – (हिरवा),राखी यवले – (मोरपंखी),माधवी सुर्वे – (जांभळा)
या स्पर्धकांना पारितोषिक प्राप्त झाले.
या स्पर्धेचे प्रायोजक “वस्त्रकला साडी सेंटर”होते.यांच्यातर्फे विजेत्या महिलांना साडी देण्यात येणार होती,त्याप्रमाणे विजेत्या महिलांना वस्त्रकला साडी सेंटर कडून साडी देण्यात आली.
तसेच आपला आवाज आपली सखीकडून चांदीचा दिवा देण्यात आला.
या विजेत्या सखीचं अभिनंदन करण्यासाठी, ‘आपला आवाज आपली सखीच्या” स्टुडिओ मध्ये प्रसिध्द गायिका सावनी रवींद्र या उपस्थित होत्या. “आपला आवाज आपली सखीच्या” संचालिका संगीता तरडे या देखील यावेळी उपस्थित होत्या ,त्यांनी ही सर्व विजेत्या सखीचं अभिनंदन करत, अशाच वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहन दिले.
या स्पर्धेतील विजेते आणि या स्पर्धेत ज्यांनी सहभाग घेतला आहे त्या सर्वांचे आपला आवाज न्यूज नेटवर्क व आपला आवाज आपली सखीच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन…
आपला आवाज आपली सखी च्या इतर online स्पर्धेंची माहीती मिळवण्यासाठी आजच आपला आवाज आपली सखी च्या फेसबूक पेज ला Like करा आणि आपला आवाज आपली सखी चे सभासद व्हा!