महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने फसवणूक

१२ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


पनवेल महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने एकाची चार लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली . हा प्रकार डिसेंबर २०२१ ते नोव्हेंबर २०२२ दरम्यान तळेगाव दाभाडे येथे घडला . याप्रकरणी नागेश तानाजी जगताप ३२ , रा . पंचवटी कॉलनी , तळेगाव दाभाडे यांनी गुरुवारी दि . १० तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे . त्यानुसार , संदीप मारुती पांडव ३० , रा . ऐरोली , नवी मुंबई , जगन्नाथन बालकृष्ण ३७ , रा . सेंट्रल रेल्वे कॉलनी , जुईनगर , ठाणे नितीन महादू वाघ ३८ , रा . सेक्टर २० , उलवे , नवी मुंबई यांना अटक करण्यात आली आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांना पनवेल महापालिकेत भरारी पथकामध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवले . त्यासाठी फिर्यादी यांच्याकडून साडेपाच लाख रुपये घेतले . तसेच , फिर्यादी यांना बनावट ओळखपत्र देखील बनवून दिले . मात्र , फिर्यादी यांच्या ही बाब लक्षात आली त्यानंतर आरोपींनी त्यांना दीड लाख रुपये माघारी दिले . दरम्यान , फिर्यादी यांनी उर्वरित पैशांची मागणी केली असता आरोपींनी त्यांना उडवा उडवीची उत्तरे देत फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *