पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विषय समित्यांच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१८ नोव्हेंबर २०२१

पिंपरी-चिंचवड


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विधी समिती, महिला व बाल कल्याण समिती, शहर सुधारणा समिती, क्रीडा कला साहित्य व सांस्कृतिक समिती आणि शिक्षण समिती सभापतीपदी अनुक्रमे स्वीनल कपिल म्हेत्रे, सविता बाळकृष्ण खुळे, अनुराधा गणपत गोरखे, उत्तम प्रकाश केंदळे आणि माधवी राजेंद्र राजापुरे यांची रितसर वैधरित्या बिनविरोध निवड झाली. महापालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती पदाच्या निवडणूकीसाठी महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामधील माजी महापौर दिवंगत मधुकर पवळे सभागृहात समितीनिहाय विशेष सभा घेण्यात आली.

पुणे विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी या सभांचे पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. निवडणूकीच्यावेळी उपायुक्त अजय चारठाणकर, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे आदी उपस्थित होते.  नगरसचिव उल्हास जगताप यांनी सर्व सभांचे कामकाज पाहिले.  नवनिर्वाचित विषय समिती सभापतींचे महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले तसेच सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी अभिनंदन केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *