भगवान के घर देर है अंधेर नहीं! ठाकरेंचे दिवस आलेच …

अतुल परदेशी
मुख्य संपादक
२४ ऑगस्ट २०२२


राजकारणात सरळ माणूस टिकत नाही … आपल्याकडे मराठीत म्हण सुद्धा सरळ झाडालाच नेहमी कापलं जात त्यामुळे या जगात सरळ राहू नका .. वेळोप्रसंगी तुम्हाला वाकड्यात घुसावाच लागत … आणि वाकड्यात जाऊन नडणारे बाळासाहेब होते त्यांचा मुलगा तर सरळ आहे … मवाळ आहे … आणि अशा सरळ माणसाला धोका देऊन जर कोणी वर आले असेल ते फार काळ टिकणार सुद्धा नाही … उगीच नाही म्हणत भगवान के घर देर हैं पर अंधेर नहीं … आता नेमकी घडलं काय ते तुम्हाला सांगते आणि मी का म्हणतेय कि ठाकरेंचे दिवस आले त्याला कारण २ आहेत … कारण एक ५० आमदार सोबत घेऊन आपण म्हणजेच शिवसेना म्हणणारा शिंदे गट आणि कोर्टात या प्रकरणाला खेचणारा मूळ ठाकरे गट … यामध्ये आतपर्यंत घडलेल्या घडामोडींवरून तरी ठाकरेंच्या बाजून दिलासा देणारे निर्णय न्यायालयाकडून येत आहे त्यामुळे वेगळा गट फोडून सरकार आणून सुद्धा शिंदेंना शांत झोप लागत नाही त्याला कारण म्हणजे न्यायालयात सुरु असलेला युक्तिवाद आणि ठाकरेंचेच जड असलेले पारडे .. आणि यातच दुसरा मुद्दा आज घडला तो असा कि महाविकास आघाडीने सत्तेच्या काळात वाढवलेली वार्ड रचना जी २२७ वरून २३६ वर नेली होती ती आताच्या सरकारने पुन्हा रद्द करून २२७ वर आणली यालाच शिवसेनेकडून सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले आणि निर्णय ठाकरेंच्या बाजून आला … न्यायालयाने महाविकासाआघाडीने केलेली वार्डरचना जैसे थे ठेवायला लावली आहे आणि त्यामुळे शिंदे आणि फडणवीस यांना मोठा धक्का बसला तर ठाकरेंचे दिवस आलेच … अशी चर्चा सुरु झाली आहे शिवसेनेसंदर्भातील विविध याचिका सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहेत. ही सुनावणी येत्या 25 ऑगस्टला होणार आहे. तोपर्यंत आयोगाने कोणताही निर्णय देऊ नये, असे आदेश कोर्टाने दिले आहेत. सुप्रीम कोर्टातील हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *