शिंदे गटात प्रवेश करताच गजानन कीर्तिकरांची उद्धव ठाकरेंवर टीका

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१२ नोव्हेंबर २०२२


ठाकरे गटाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शुक्रवारी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. किर्तीकर शिंदे गटात गेल्यानंतर त्यांची ठाकरे गटाकडून नेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रवेशानंतर बोलताना गजानन किर्तीकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

एका योग्य मार्गाने शिवसेना नेण्याचा एकनाथ शिंदेंचा मानस आहे. तो मला स्पष्ट दिसला. शिवसेनेचे, बाळासाहेबांचे हिंदुत्वाबाबतचे, मराठी माणसाचे विचार त्यांनी अंगीकारले. त्यावर ते मार्गक्रमण करत आहेत. त्याबद्दल माझ्या मनात आकर्षण निर्माण झालं. खऱ्या अर्थाने ते बाळासाहेबांची शिवसेना पुढे नेत आहेत. या आपुलकीने मी या संघटनेत प्रवेश केला”, असं गजानन किर्तीकर म्हणाले.आम्ही सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसची सोबत सोडा. सगळ्या खासदारांनी हे सांगितलं होतं. पण त्यानंतरही धोरणात काही बदल होत नाही म्हणून ते १२ खासदार गेले. मी यासाठीच थांबलो होतो की काही बदल होतो का? ते पाहावं. आपण उडी मारायची आणि आपण सांगायचं समेट करा, राष्ट्रवादी सोडा असं नको म्हणून थांबलो. पण या धोरणात काही बदल झाला नाही असं किर्तीकर यांनी स्पष्ट केलं.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *