ही या नव्या सरकारची कायदा-सुव्यवस्था आहे का?; जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेनंतर रोहित पवार आक्रमक

आपला आवाज न्यूज नेटवर्क
११ नोव्हेंबर २०२२


‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाचा शो राष्ट्रवादीने बंद पाडल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे. वर्तकनगर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांना अटक केली आहे. आव्हाड यांच्या अटकेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनीदेखील ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित पवार म्हणाले, ज्या प्रेक्षकाला मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला तोच प्रेक्षक म्हणतोय की, “आव्हाड यांची काहीच चूक नव्हती, उलट त्यांनी माझी मदत केली, त्यांना पोलिसांनी जाणून बुजून अटक केली आहे”. यावरून भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे.

सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करणाऱ्यांना, जादूटोणा कायद्याला आव्हान देणाऱ्यांना मोकळं सोडायचं आणि छत्रपतींचा खोटा इतिहास दाखवणाऱ्या चित्रपटाला विरोध करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांना अटक करायची ही या नव्या सरकारची कायदा-सुव्यवस्था आहे का? असा सवाल ही रोहित पवारांनी केला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *