बेळगावात कलम १४४ लागू, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याला परवानगी नाकारली

१९ डिसेंबर २०२२


कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन बेळगावात आजपासून सुरू होणार आहे. त्याला उत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीकडून व्हॅक्सीन मैदानावर आयोजित केलेल्या मेळाव्याला अचानक कर्नाटक पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तसेच कर्नाटकात कलम १४४ लागू करण्यात आले असून जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे.

कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद निवळण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत जो तह करण्यात आला त्या तहाला कर्नाटक सरकारकडून हरताळ फासण्यात आला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आयोजित मेळाव्यासाठी उभारण्यात येत असलेल्या स्टेजच्या उभारणीचे काम थांबवण्यात आले असून स्टेज हटवण्यात आला आहे. काल मेळाव्यास कर्नाटक पोलिसांकडून परवानगी देण्यात आली होती. मात्र आता अचानक काम थांबविण्यात आले आहे.

बेळगावचे पोलीस उपायुक्त रविंद्र गाडादी यांनी काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. रविंद्र गाडादी म्हणाले, मेळाव्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आली नाही. त्यासंदर्भात एकीकरण समितीला पत्र देखील देण्यात आले. मेळाव्यात कोणाताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. तर काल रात्री स्टेज उभारण्यासाठी कर्नाटक पोलिसांकडून परवानगी देण्यात आली होती. मात्र आज अचानक पोलिसांनी स्टेजचे काम थांबवले असून ही आमची गळचेपी असल्याची असल्याची प्रतिक्रिया महराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांनी दिली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *