चिंतामणी राञ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचा इ.१२ वी चा शंभर टक्के निकाल

आपला आवाज न्यूज नेटवर्क
दि ११ जून २०२२

चिंचवड


चिंतामणी राञ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय,चिंचवड स्टेशन,पुणे १९ चा सलग तिस-या वर्षी इ.१२ वी काॅमर्सचा शंभर टक्के निकाल लागला आहे.पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीमध्ये ही एकमेव राञप्रशाला आहे.या कनिष्ठ महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी व विद्यार्थींनी दिवसा हाॅटेल,वर्कशाॅप,आॅफीसबाॅय, हंगामी कामगार इ.विविध प्रकारची कामे करत असतात.अशा विद्यार्थी वर्गास अपूर्ण शिक्षण राहिलेल्या व शिक्षणाची आवड असणा-या विद्यार्थ्यांसाठी चिंतामणी राञप्रशाला एक आशेचा किरण आहे.

या शैक्षणिक वर्षामध्ये इ.१२ वी स प्रविष्ठ झालेले सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शंभर टक्के निकालाची परंपरा जपली आहे.या वर्षीही शंभर टकके निकाल लागल्याबद्दल विद्यार्थी वर्गाचे प्राचार्य दिलीप लंके यांनी पेढे व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.महाविद्यालयात प्रथम क्रमांक-कृष्णा वाघमारे (६०.१७%),द्वितीय क्रमांक-राम पवार (५८.६७%),तृतीय क्रमांक-दिपाली पिल्लोलू(५६.१७) गुण संपादन केले आहे.

चिंतामणी राञप्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विद्यार्थांना मार्गदर्शन प्रा.राजेंद्र सोनवणे,प्रा.सौ.रुकसाना शेख,प्रा.सौ.प्रिया भामरे,प्रा.रामधन कसबे,मारुती वाघमारे, इ.मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थी व प्राध्यापक वर्गाचे शालासमिती अध्यक्ष चंद्रशेखर बोरकर व प्राचार्य दिलीप लंके यांनी ही अभिनंदन केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *