फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही – जितेंद्र आव्हाड

आपला आवाज न्यूज नेटवर्क
११ नोव्हेंबर २०२२


ठाण्यात मॉलमधील सिनेमागृहात केलेल्या मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे.वर्तकनगर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांना अटक केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत अटकेआधीचा घटनाक्रम सांगितला आहे.

आज दुपारी साधारण 1 वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो.मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेह-यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल.
अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही. असंही जितेंद्र आव्हाड ट्विट करत म्हणाले आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *