मध्य महाराष्ट्र आणि कोकणच्या काही भागांत पाऊस पडण्याची शक्यता

११ नोव्हेंबर २०२२

पुणे


राज्यात दिवसा ढगाळ वातावरण राहिल्यामुळे कमाल तापमानात वाढ होत आहे, तर रात्रीच्या वेळी किमान तापमानात वाढ होत आहे. मात्र, 13 आणि 14 नोंव्हेबरला मध्य महाराष्ट्र आणि कोकणच्या काही भागांत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात नोव्हेंबरच्या सुरुवातीस असलेली थंडी आता कमी होऊ लागली असून, अनेक भागांत अंशत: ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यातच चार ते पाच दिवसांत दक्षिण कोकणात तुरळ ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या महिन्यात पुढील काळात वातावरणाच्या स्थितीत सातत्याने बदल होणार आहेत.

राज्यात ऑक्टोबरअखेरच्या आठवड्यात किमान तापमानात झपाट्याने घट होऊन गारवा निर्माण झाला. नोव्हेंबरच्या सुरुवातीलाही राज्याच्या बहुतांश भागांतील तापमानात घट होऊन थंडी अवतरली. या काळामध्ये राज्यात आकाशाची स्थिती निरभ आणि कोरडे हवामान निर्माण झाल्याने प्रामुख्याने किनारट्टीच्या भागात कोकण विभागामध्ये आणि विदर्भात काही भागांत दिवसाच्या कमाल तापमानात वाढ होऊन उन्हाचा चटका वाढला. याच कालावधीत मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात बहुतांश भागांत तापमानाचा पारा घसरला होता. औरंगाबाद, पुणे, नगर, नाशिक, जळगाव आदी भागांत नीचांकी तापमानाची नोंद झाली. आता मात्र पुन्हा राज्याच्या बहुतांश भागांत आता अंशत: ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे दिवसाचे तापमान सरासरीच्या जवळपास आले आहे. काही भागांत रात्रीही अंशत: ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने रात्रीच्या किमान तापमानात वाढ झाली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *