शहरातील ४० खेळाडूंना मिळणार मोफत प्रशिक्षण

११ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


पिंपरी चिंचवड महापालिकेचे भोसरी येथील मारुतराव लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल मुंबई येथील नरसिंग रेसलिंग अकॅडमीस चालवण्यास देण्यात येणार आहे . या केंद्रामधून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडण्यास मदत होणार आहे अकॅडमीला चालवण्यासाठी दिले असले तरी शहरातील ४० खेळाडूंना अकॅडमीच्या वतीने मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे . ही अकॅडमी ऑलिम्पिक खेळाडू व ट्रीपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव यांची आहे . महापालिकेने भोसरीतील गाव जत्रा मैदानाशेजारी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारले आहे . त्याचे उद्घाटन होऊन आठ महिने झाले आहेत.

शहरातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती प्रशिक्षण मिळावे म्हणून संकुल नामांकित कुस्ती प्रशिक्षकास चालविण्यास देण्याचा निर्णय तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी घेतला होता. त्याबाबत त्यांनी पुणे जिल्ह्यातील अनुभवी व पुरस्कार पात्र खेळाडू , प्रशिक्षक ,केंद्रचालक व वस्ताद , तज्ज्ञ यांची बैठक घेतली होती . त्याबाबतच्या प्रस्तावाला सहमती देण्यात आली . त्यानुसार ऑलिम्पिक खेळाडू नरसिंग यादव यांच्याकडे विचारणा केली त्यांच्या अकॅडमीत २४ आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू तयार झाले आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *