जेलमध्ये आलेल्या अनुभवांचं पुस्तक तयार – संजय राऊत

आपला आवाज न्यूज नेटवर्क
११ नोव्हेंबर २०२२


शिवसेना खासदार संजय राऊत १०० दिवसांहून अधिक काळ तुरुंगात होते. अखेर त्यांना बुधवारी (९ नोव्हेंबर) जामीन मिळाला आणि ते तुरुंगातून बाहेर आले. गुरुवारी (१० नोव्हेंबर) त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि नंतर पत्रकार परिषदही घेतली. यावेळी राऊतांनी तुरुंगात दोन पुस्तकं लिहिल्याची माहिती दिली. तसेच ते लवकरच प्रकाशित होतील, असंही नमूद केलं

संजय राऊत म्हणाले, तुरुंगातील दिवसांमध्ये आलेल्या अनुभवावर पुस्तक येणार का? यावर संजय राऊत म्हणाले, “माझं पुस्तक तयार झालं आहे. हे अनुभव असतात हे लोकांपर्यंत पोहचवायचे असतात. मी तुरुंगात दोन पुस्तकं लिहिली आहेत. मी लिहिणारा माणूस आहे. त्यामुळे मी वेळेचे सदुपयोग केला. मी तुरुंगात सतत वाचण्याचा प्रयत्न करत होतो.

पुस्तक किंवा वर्तमानपत्रातील जे जे वाचलं त्यातील आवडलेल्या आणि लोकांपर्यंत गेल्या पाहिजे अशा गोष्टी मी माझ्या डायरीत लिहून ठेवल्या आहेत. त्या डायरीतील गोष्टींचं पुस्तक काढावं आणि ते लोकांपर्यंत पोहचावं असं मला वाटतं. हल्ली लोकांचं वाचन कमी झालं आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या हल्लीची मुलं वाचत नाहीत. तरुण लोक वाचत नाहीत असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलं.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *