शहरातील वेगवेगळ्या चौकांत उभारण्यात आलेली १५ शिल्प उद्घाटनाअभावी धूळ खात आहे

११ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागाच्या वतीने टाकाऊ वस्तूंपासून १५ शिल्प तयार करण्यात आली आहेत . ती शहरातील वेगवेगळ्या चौकांत उभारण्यात आली असून उद्घाटनाअभावी ती धूळ खात आहेत . आता आणखी ८ शिल्पे टाकाऊतून बनविण्यात येणार आहेत . ती शिल्प उभारल्यानंतर त्याभोवती सुशोभीकरण्यासाठी आर्किटेक्ट सल्लागाराला ९ लाख रुपये शुल्क दिले जाणार आहे . तीन निविदा प्राप्त : तिसरा परिसंवाद आयोजित करून पालिका टाकाऊतून आणखी ८ शिल्प तयार करीत केली जात आहे . ही शिल्पे निश्चित झालेल्या ठिकाणी नेणे , त्या ठिकाणी त्याचे पेडेस्टल व फाउंडेशन तयार करणे , शिल्पाच्या आजूबाजूला सुशोभीकरण करणे . त्यासाठी आर्किटेक्ट नेमण्यासाठी दरपत्रक मागविण्यात आले होते . त्यात शिल्पी आर्किटेक्ट अॅण्ड प्लॅनर्स टंडन अर्बन सोल्युशन व निओजेन कन्सल्टंट्स अशा ३ एजन्सीचे दर पात्र ठरले .

सर्वांत कमी ९ लाख ८० हजारांचा दर शिल्पी आर्किटेक्टकडून प्राप्त झाला . तो दर मंजूर करण्यात आला . दर कमी करण्याबाबत पत्रकार व्यवहार केल्यानंतर शिल्पी आर्किटेक्टने ९ लाखांत काम करण्यास सहमती दिली आहे . या पूर्वीचे कामही उद्घाटनाअभावी शिल्पे झाकून शहर १८१ चौरस किलोमीटर क्षेत्रफळात वसले आहेत . शहरात एकूण १ हजार २०० किलोमीटर अंतराचे रस्ते असून , १८४ उद्याने आहेत . शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी ठिकठिकाणी शिल्प उभारण्यात येत आहेत . चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे दोन वेळा परिसंवाद घेण्यात आला . त्यात एकूण १५ शिल्प तयार करण्यात आली . ती सर्व शहरातील वेगवेगळ्या चौकांत उभारण्यात आले आहेत . मात्र , पाच महिने उलटूनही अद्याप त्या शिल्पाचे उद्घाटन करण्यात आलेले नाही . ती शिल्पे कापडात झाकून ठेवण्यात आली आहे . त्यामुळे चौकांचे सौंदर्यास बाधा पोहोचत आहे . करण्यात आले आहेत . शिल्पी आर्किटेक्टने केले असून १५ शिल्पासाठी ९ लाख रुपये अदा करण्यात आले आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *