पिंपरीतील उड्डाणपूल कामामुळे वाहतुकीत बदल

१० नोव्हेंबर २०२२

पिंपरी


पिंपरी येथील इंदिरा गांधी रेल्वे उड्डाण पुलाच्या दुरुस्तीचे चौथ्या टप्प्यातील काम सुरू करण्यात आले आहे . त्यामुळे परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत . पिंपरीतील इंदिरा गांधी रेल्वे उड्डाण पुलाच्या दुरुस्तीचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे . उड्डाण पुलावरून चार बाजूंनी वाहतूक होते . प्रत्येक बाजूचे स्वतंत्रपणे दुरुस्तीचे काम केले जात आहे . त्यासाठी वाहतुकीत बदल केले जात आहेत . उड्डाण पुलावरून भाटनगरकडे जाणाऱ्या मार्गाची डागडुजी सुरू करण्यात आली आहे . त्यामुळे वाहतुकीत खालीलप्रमाणे बदल करण्यात आले आहेत.

पिंपरी पुलावरून भाटनगरकडे जाणारी वाहतूक गोकुळ हॉटेल शगुन चौक- कराची चौक- रिव्हर रोड- भाटनगर चौककडून पुढे लिंकरोडकडे जाईल . भाटनगरकडून पिंपरी पुलाकडे जाणारी वाहतूक भाटनगर रिव्हर रोड – कराची चौक , शगुन चौक  – पिंपरी पूल – क्रोमा शोरुम – मोरवाडी चौक अशी जाई . पिंपरी उड्डाण पुलाच्या दुरुस्तीच्या कामादरम्यान पहिल्या टप्प्यातील भाटनगर बाजूकडील काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक रिव्हररोड – शगुन चौकमार्गे राहील . काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे स्पॅनवरील एकाबाजूने दुहेरी वाहतूक चालू ठेवण्यात येईल . पिंपरीगावामध्ये पिंपरी चौक अहिल्यादेवी पुलावरून चौकाकडून येणाऱ्या पीएमपीएमएलच्या बसेस एम्पायर इस्टेट काळेवाडीमार्गे वळविण्यात येत आहे . व पिंपरी अवजड वाहनांना डेअरी फार्म रोडमार्गे , डिलक्स चौक तसेच भाटनगरमार्गे सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत प्रवेशबंदी करण्यात आली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *