महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पारनेर तालुकाध्यक्ष दत्ता गाडगे ” कोरोनायोध्दा ” पुरस्काराने सन्मानित..

सदानंद शेवाळे ब्युरोचिफ आंबेगांव : – दैनिक नगरी दवंडी या वृत्तपत्राचा वर्धापनदिन अहमदनगर येथील मुख्य कार्यालयामधे मोठ्या जल्लोषामधे संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पारनेर तालुका अध्यक्ष आपला आवाज न्युज चॅनलचे विभागीय संपादक दत्ता गाडगे यांना सन्मानपत्र देवुन ” कोरोना योध्दा ” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.कोरोनाच्या पार्श्वभूमिवर दत्ता गाडगे यांनी अनेक समाजाभिमुख बातम्या करत,समाजाला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला. लाॅकडाऊन असतानाही पहील्या दिवसापासुन आजपर्यंतच्या सर्व अपडेट्स त्यांनी इलेक्ट्राॅनिक आणि प्रिन्ट मिडीयाच्या माध्यमा मधुन समाजा पर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली.

एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी जिवाची पर्वा न करता सर्व कोव्हिडसेंटरमधे जावुन सर्व अपडेट्स,बातम्या करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. हे सर्व करत असताना आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतुन त्यांनी राज्य मराठी पत्रकारसंघाच्या माध्यमातुन पारनेर तालुक्या मधील ग्रामपंचायतचा शिपाई ते तालुक्याच्या लोकप्रतिनि पर्यंत सगळ्यांना ” कोरोनायोध्दा ” पुरस्कार देवुन सन्मानित केले आहे.तसेच पारनेर तालुक्यातील पत्रकारांना कोरोना काळामधे पावसाळ्यात बातम्या करताना अडचन येवु नये म्हणुन त्यांनी पत्रकारसंघाचे माध्यमातुन पत्रकारांना रेनकोटचे वाटप करत समाज हिताची जपणुक केली आहे.

समाजासोबतच पत्रकारांच्या विविध प्रश्नावरही त्यांनी अध्यक्ष म्हणुन नेहमीच आवाज उठवला आहे.त्यांनी समाजहित डोळ्या समोर ठेवत नेहमी प्रामाणिकपणे, निर्भिड, निपक्ष बातमीदारी केली.त्यांच्या कार्याची दखल घेत दैनिक नगरी दवंडी ने त्यांना सन्मान चिन्ह देवुन वर्धापनदिनाचे औचित्य साधत ” कोरोनायोध्दा ” पुरस्कार देवुन सन्मान केला आहे. यावेळी दैनिक नगरीदवंडीचे संपादक राम नळकांडे,कार्यकारी संपादक राजकुमार कटारीया, दै. नगरी दवंडीचे पारनेर तालुका प्रतिनिधी संतोष सोबले, पत्रकार संपत वैरागर आधी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *