क्रिकेटर रवींद्र जडेजाच्या पत्नीला गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून उमेदवारी

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१० नोव्हेंबर २०२२


रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा हिला भाजपानं गुजरात विधानसभा निवडणुकीत तिकीट दिलं आहे. त्यामुळे रिवाबा जडेजा या निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय विश्वात पदार्पण करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे भाजपानं विद्यमान आमदाराला टाळून रिवाबाला निवडणुकीचं तिकीट दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा हिला भाजपा तिकीट देणार असल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू होती. अखेर ही चर्चा खरी ठरली असून आज रिवाबाच्या तिकिटाची घोषणा भाजपाकडून करण्यात आली आहे. आगामी निवडणुकीत जामनगर उत्तर या मतदारसंघातून रिवाबा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *